खाटीक (कुरेशी) समाजाच्या पुकारलेल्या बंदमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची खरेदी-विक्री थंडावली, राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी.

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / मुदखेड येथे प्रत्येक रविवारी जनावरांचा बाजार भरतो त्यात जिलाभरातून शेतकरी, व्यापारी जनावरे खरेदी विक्रीसाठी आणतात पण दि. 19 जुलैपासून नांदेड जिल्ह्यात खाटीक (कुरेशी) समाजाने एक बैठक घेत जनावरे खरेदी न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला त्यामुळे भर पावसाळ्यात शेतकऱ्यांची जनावरे कोणीच विकत घेत नसल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक माध्यम प्रतिनिधींना बोलताना व्यक्त करत राज्य सरकारने या मागणीकडे विशेष लक्ष देत तोडगा काढण्याची अपेक्षा यावेळी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली गेली आहे.
सविस्तर वृत्त असे की शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले जनावरे परिवहन करताना बजरंग दल सह इतर संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यात जनावरांच्या वाहतुकीचे वाहन अडवून परिवहन करणाऱ्या लोकांना मारहाण करत परिवहन करत असलेले जनावरे पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यासाठी भाग पाडत आहे त्यामुळें खाटीक (कुरेशी)समाजाला आर्थिक नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे राज्यभर खाटीक समाजाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्यावर होणाऱ्या वाहतूक अडवणे, अतोनात मारहाण ,
शोषण आणि आर्थिक कोंडी करून अडचणीत आणत आहे ह्या सर्व समस्यांसाठी जनावरांची खरेदी न करण्याचा एकमताने निर्णय घेत शासनाच्या परिपत्रकानुसार ठरवण्यात आलेल्या जनावरांची कतली न करण्याचा आणि खरेदी अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा एकमताने निर्णय घेतला असून जोपर्यंत राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यात येणार नाही तोपर्यंत खाटीक (कुरेशी) समाजासह शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक फटका सहन करावा लागेल अशीच परिस्थिती दिसत आहे आणि सरकारने यांच्या मागण्यांकडे लक्ष देत लवकरात लवकर योग्य ते निर्णय घेत मार्ग काढावा अशी अपेक्षा केली जात आहे.



