देगलूर पोलिसांची कारवाई : अवैध गुटखा वाहतूक करणारे दोघे अटकेत, ₹14.88 लाखांचा मुद्देमाल जप्त

देगलूर (जि. नांदेड) – स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे शोध पथकाने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघा आरोपींना बोलेरो गाडीसह ताब्यात घेतले असून, त्यांच्या जवळून एकूण ₹14,88,800/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी: शेख आफताब शेख गुलाब (वय 25 वर्षे), रा. आजम कॉलनी, हिंगोली
शोएब खान शरिफ खान (वय 31 वर्षे), रा. आजम कॉलनी, हिंगोली
जप्त केलेला मुद्देमाल: केसर युक्त विमल पान मसाला – 1540 पुडे (प्रत्येकी ₹198) – ₹3,04,920/- 500 पुडे (प्रत्येकी ₹470) – ₹2,35,000/- V-1 BIT TOBACCO – 540 पुडे (प्रत्येकी ₹22) – ₹33,880/- 500 पुडे (प्रत्येकी ₹30) – ₹15,000/-
वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो गाडी (MH 28 AZ 0202) – अंदाजे किंमत ₹9,00,000/- एकूण मुद्देमालाची किंमत: ₹14,88,800/-
पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांच्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ मोहिमेअंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक श्री. मारोती श्रीराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने देगलूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात तपास सुरू केला.
तपासादरम्यान MH 28 AZ 0202 क्रमांकाच्या बोलेरो वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये वरील दोन्ही आरोपी मानवी आरोग्यास हानीकारक व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक करत असल्याचे आढळले. याप्रकरणी दोघांना तात्काळ ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या उल्लेखनीय कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक नांदेड श्री. अभिनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व गुन्हे शोध पथकातील अंमलदारांचे विशेष कौतुक केले आहे.



