अंडर-18 आंतर-जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेची घोषणा!

नांदेड (२० जुलै): नांदेड शहर अंडर-18 आंतर-जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेची घोषणा!व जिल्हा अॅमॅच्युअर बास्केटबॉल असोसिएशनतर्फे अंडर १८ (कनिष्ठ) आंतर-जिल्हा बास्केटबॉल स्पर्धा २६ व २७ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा श्री गुरु गोविंदसिंहजी स्टेडियम, नांदेड येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेचा प्रमुख उद्देश जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडू शोधणे असून, निवड झालेले खेळाडू येत्या ०९ ऑगस्टपासून पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील.
पात्रता व सहभाग:
१ जानेवारी २००७ किंवा त्यानंतर जन्म झालेले खेळाडू पात्र
संलग्न व असंलग्न संस्थांच्या संघांसाठी संधी खुली.
खेळाडू नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असावेत किंवा जिल्ह्यातील संस्थेचे प्रतिनिधी असावेत.
नोंदणी शुल्क:
प्रति संघ: ₹१०००/-
निवड चाचणीसाठी (व्यक्तिगत): ₹२००/- प्रति खेळाडू
ज्यांच्याकडे संघ नाही, त्यांनीही स्पर्धेच्या दिवशी वैयक्तिक निवड चाचणीत सहभागी व्हावे. सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
विनोद गोस्वामी: ९८९०३९८०९१
विष्णू शिंदे: ९७६७०४७५२५
Ask ChatGPT



