घरकुल योजनेचा डी पी आर तयार करून लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यासाठी शहर युवक काँग्रेसचा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / मुदखेड शहरातील गरजू नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळविता यावा याकरिता आज दि. 22 जुलै रोजी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजीब पठाण यांच्या नेतृत्वात नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शैलेश फडसे यांची भेट घेऊन शहरातील प्रलंबित नवीन डी पी आर आराखडा तयार करून घरकुल योजनेतील गरजू असलेल्या लाभार्थ्यांची यादी त्वरित शासन स्तरावर मंजूर करून घेण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करत घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नगरपरिषदेत वारंवार त्यांच्या अधिकारासाठी व न्यायासाठी पाठपुरावा कर अशी भूमिका शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजीब पठाण यांनी व्यक्त केली.
या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की गरजू घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना डी पी आर मध्ये आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता तर करावी लागत आहे पण नवीन डीपीआर आराखडा तयार करून केंव्हा शासन स्तरावर तांत्रिकदृष्ट्या मंजूर करून घेण्यात येईल अशी अपेक्षा गरजू घरकुल योजनेतील लाभार्थी करत असताना दिसत आहे यावेळी शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अविनाश चौदंते,वेदांत शेवटे आणि शहर युवक सचिव आकाश सोनटक्के यावेळी उपस्थित होते.



