परभणीत काँग्रेसचं आंदोलन – राज्यपालांना निवेदन, जन सुरक्षा विधेयकास विरोध, कृषी मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी

परभणी, दि. 21 जुलै – परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्याकडे जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात काँग्रेसने राज्य सरकारच्या जन सुरक्षा विधेयक क्र. 33/2024 ला मंजुरी देऊ नये, तसेच राज्याचे कृषी मंत्री यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी केली.
सदर विधेयक घाईगडबडीत आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधात आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले असून, हे विधेयक नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना पायदळी तुडवणारे आहे. त्यामुळे महामहीम राज्यपालांनी या विधेयकास मंजुरी नाकारावी, अशी स्पष्ट भूमिका परभणी काँग्रेसने मांडली.
महाराष्ट्राचे कृषी मंत्री सभागृह चालू असताना ऑनलाइन रमी खेळताना आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून, तसेच ते वारंवार शेतकऱ्यांच्या विरोधात विधाने करत असल्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी काँग्रेसने मागणी केली.
लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या गुंड प्रवृत्तीच्या घटनांचा काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या पार्श्वभूमीवर परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला. “जन सुरक्षा विधेयक रद्द करा”, “शेतकरी विरोधी मंत्री हटवा”, “लोकशाही वाचवा” अशा घोषणा देतकार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.यावेळी जिल्हा शहराध्यक्ष नदीम इनामदार, मा.उपमहापौर भगवान वाघमारे, रामभाऊ घाडगे, रवि सोनकांबळे, सुहास पंडित, अमोल जाधव, गुलमीर खान, सुनील देशमुख, गुलाम मिठु मोहम्मद, श्रीधर देशमुख, अब्दुल सईद, जानू बी मॅडम, रत्नमाला शिंगनकर,बाळासाहेब फुलारी , गणेश वाघमारे,दिगंबर खरवडे, वैजनाथ देवकते , शेख मतीन, नागसेन भेरजे आदी पदाधिकारी व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.



