शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप कार्यक्रम

नांदेड: शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 30 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा, चौफाळा येथे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड-हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख भुजंग दादा पाटील, महानगरप्रमुख प्रकाशभाऊ मारावार, नांदेड दक्षिण उपजिल्हाप्रमुख यकोबा येडे पाटील, युवा सेना मराठवाडा सचिव महेशभाऊ खेडकर आणि नांदेड दक्षिण महानगरप्रमुख मनोज यादव उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नांदेड दक्षिण उपजिल्हा संघटक गजानन पाटील हारकरे आणि गणेश पेन्सिलवर, प्रभाग क्र. 14, होळी चौफाळा यांनी केले आहे. शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



