जिला

नांदेड जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सन्मान

पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

 

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या मनोबल वाढीसाठी पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या पुढाकाराने प्रशस्तीपत्र वितरण समारंभ पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे आज दि. 26 जुलै 2025 रोजी पार पडला. या उपक्रमाचा उद्देश कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सन्मान करून त्यांच्या कार्यात उत्साह वाढवणे आणि भविष्यात अधिक उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहन देणे हा होता.

या समारंभात बेस्ट डिटेक्शन, CCTNS Data Feeding, e-Sakshya App वापर, गुन्हे निर्गती, समन्स व वॉरंट बजावणी यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

बेस्ट डिटेक्शन (गुन्ह्यांचा जलद तपास):
हिमायतनगर पोलीस स्टेशन – गु.र.नं. 122/2025 प्रकरणातील आरोपीचा 24 तासांत शोध घेऊन 2.74 लाखांचा मुद्देमाल जप्त करणाऱ्या पोनि अमोल भगत, पोह. नामदेव जाधव, पोह. बालाजी पाटील, पोकॉ. चंद्रकांत अरकीलवार यांचा गौरव.

वजिराबाद पोलीस स्टेशन – सोन्याच्या 10.5 तोळे दागिन्यांसह 4.20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करणाऱ्या पोनि परमेश्वर कदम, सपोनि राजु वटाणे, पोकॉ रमेश सुर्यवंशी, पोकॉ इम्रान शेख यांचा सन्मान.

CCTNS Data Feeding मध्ये अव्वल:
देगलूर पोलीस स्टेशन – 71% डेटा फीडिंग करून 143 गुण मिळवले; पोनि मारोती मुंडे, एएसआय किरण कुलकर्णी यांचे कौतुक.

सोनखेड पोलीस स्टेशन – 72% डेटा फीडिंगसह 144 गुण मिळवले; सपोनि पांडूरंग माने, मपोकॉ सुनिता हमपल्ले सन्मानित.नांदेड ग्रामीण – 708 SID तयार, त्यापैकी 624 FIR शी लिंक; पोनि ओमकांत चिंचोलकर सन्मानित.माळाकोळी – 54 SID तयार, त्यापैकी 51 FIR शी लिंक; सपोनि महेश मुळीक यांचे कौतुक.

गुन्हे निर्गती:
नांदेड ग्रामीण (162 गुन्हे) – पोनि ओमकांत चिंचोलकर
वजिराबाद (101 गुन्हे) – पोनि परमेश्वर कदम
उस्माननगर (58 गुन्हे) – सपोनि संजय निलपत्रेवार

समन्स व वॉरंट बजावणी:
मुदखेड, देगलूर, सोनखेड, इस्लापुर, अर्धापूर, कुंडलवाडी आणि सिंदखेड पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी 88% ते 100% यश दराने बजावणी केली. यामध्ये पोनि धीरज चव्हाण, पोनि मारोती मुंडे, सपोनि पांडूरंग माने, सपोनि उमेश भोसले, पोनि चंद्रशेखर कदम, सपोनि ज्ञानेश्वर शिंदे यांचा समावेश.

विशेष उल्लेखनीय कामगिरी:
आय गॉट कर्मयोगी अॅपद्वारे अधिकाऱ्यांची 100% नोंदणी व प्रशिक्षण पूर्ण करून सपोनि वर्षा डहाळे व त्यांच्या टीमने उत्कृष्ट कार्य केले.

समारोप प्रसंगी पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व सन्मानित अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भविष्यातही उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *