जिला

शासनाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांना,नियम तत्वानुसार प्रभाग रचना करण्याची मागणी

 

किनवट(प्रतिनिधी)किनवट नगर परिषदेच्या
प्रस्तावीत निवडणुकीसाठी शासनाकडुन प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यासाठी नगरपरिषदेला आदेश प्राप्त झाले असुन प्रभाग रचना तयार करण्याचे कार्य सुरु असल्याचे समजते. निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याची प्रक्रिया ही अत्यंत गोपनिय मानली जाते पण किनवट शहरात ही प्रस्तावीत प्रभाग रचना प्रसिध्द होण्यापुर्वीच, हा प्रभाग असा झाला आहे तो प्रभाग तसा झाला आहे, हा प्रभाग येथुन फुटला व तो प्रभाग तेथ पर्यंत गेला अशी उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत आहे आणि या संबंधी ईच्छुक उमेदवारात व नागरीकात दावे प्रतिदावे केले जात असल्याने प्रभाग रचनेच्या या गोपनीय प्रक्रिये बाबत राजकीय हस्तक्षेपाची शंका कुशंका उपस्थित केली जात आहे.

प्रस्तावीत प्रभाग रचना हे शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व नियम व निकषाना पुर्ण करणारी, भौगोलिक व नैसर्गीक मर्यादेचे पालन करुन प्रभागात सलगता असलेली, प्रभागातील नागरीकांना सोईस्कर व आटोपशिर व्याप्ती असलेली, नैसर्गीक व भौगोलीक मर्यादेशिवाय वस्त्याचे विभाजन टाळणारी, अकारणास्तव प्रगणक गटाची फोडाफोड नसलेली व विशेषतः अनुसुचीत जाती व अनुसुचीत जमातीच्या वस्त्याचे विभाजन टाळणारी, सर्व दोषरहीत शंका-कुशंका रहित अशी सर्व समावेशी प्रभाग रचना होणे जरुरीचे आहे.

तरी किनवट नगर परिषदेची प्रस्ताविक सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक होण्यासाठी शासनाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांना,नियम व निकषाना पूर्ण करणारी दोषरहित शंका कुशंका रहित प्रभाग रचना करण्याची मागणी शेख फैयाजोद्दीन शेख फक्रोद्दीन यांनी केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *