जिला

अखेर ‘सरेगावा’त मुलींसाठी बस पोहोचली! ‘संदीपकुमार देशमुख’ यांच्या पाठपुराव्यास यश.

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / मुदखेड तालुक्यातील मौजे सरेगाव येथे शालेय विद्यार्थिनींची अनेक वर्षापासून होणारी ससेहोलपट थांबली असून परिवहन मंडळाची बस गावात येताच शालेय मुलींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. त्यामूळे गेल्या दीड महिन्यापासून संदीपकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. यावेळी ग्रामस्थ व शालेय विद्यार्थिनींनी चालक व वाहक यांचे स्वागत केले. “बस आली शाळेत चला” असे म्हणत पाठीवर दप्तर घेऊन सरेगावातील मुलींनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सरेगावातील मुलींना शिक्षणासाठी बारड येथे जावे लागते. परंतु बस गावात येत नसल्याने गावच्या शिवेपर्यंत दोन किलोमीटर जाणे आणि दोन किलोमीटर येणे असा संघर्षमय प्रवास मुलींच्या शिक्षणावर विपरीत परिणाम करणारा ठरत होता. शासन एकीकडे बेटी पढावो बेटी बचाओ या अभियानाचा गाजावाजा करत असताना मुलींच्या शाळेत शिक्षणासाठी बस नसल्याने सरेगाव मात्र यास अपवाद ठरले होते. बस नसल्याने पायपीट करण्यासाठी सकाळी सात वाजता घराबाहेर पडावे लागत असे. आणि पुन्हा सायंकाळी दोन किलोमीटरची तीच ससेहोलपट ठरलेली होती.

याबाबत नांदेड परिवहन विभागीय मंडळाचे प्रमुख चंद्रकांत वडजकर , विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश भारती यांच्याकडे प्रा. संदिपकुमार देशमुख बारडकर लेखी निवेदन देऊन शालेय विद्यार्थिनींच्या प्रवासासाठी गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार सरेगाव रस्त्याचा पाहणी अहवालही परिवहन मंडळाने तयार केला. परिवहन महामंडळाचे वाहतूक अधिकारी कमलेश भारती, आगारप्रमुख मिलिंद सोनाळे यांनी सरेगावात विद्यार्थिनींसाठी ता. ३० जुलै रोजी ‘निळी परी’ येणार असल्याचे संदिपकुमार देशमुख यांना सांगितले.

गावात ता. ३० जुलै बुधवार सकाळी साडे नऊच्या सुमारास बस दाखल झाली. यावेळी शालेय मुलींनी गाडीच्या वाहक व चालक यांचा पुष्पहार देऊन सन्मान करत पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला. याप्रसंगी तालुका काँगेस कमिटीचे अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर यांनी नारळ फोडून गाडीचे पूजन केले. त्यावेळी प्रा. संदीपकुमार देशमुख, सरपंच बालाजी पाटील, बाबुराव कळणे, गोपिराज कळणे पाटील, भास्कर कळणे, चक्रधर पाटील, भगवान पवार, शिवाजी गिरे, प्रशांत कळणे, पुताजी कळणे, लखन गिरे, चक्रधर कळणे, अविनाश कळणे, सटवाजी कळणे, गजानन कळणे , राम कल्याणकर आदि सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *