लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती जिल्हा परिषदेच्या वतीने साजरी

नांदेड, 1- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज नांदेड जिल्हा परिषदेमध्ये साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कवली यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा कृषी अिधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक बालाजी नागमवाड, शुभम तेलेवाड, तसेच मिलिंद व्यवहारे, रणजीत गजभारे, राजेश जोंधळे, राजेश्वर आलेगावकर, अशोक वानखेडे, गायकवाड, उज्वला गजभारे, स्नेहल वळसे, मनीषा माळदे, कुलदीप जोशी, बालाजी आवर्दे, ऋषिकेश धर्मापुरीकर, बालाजी टोके, यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक योगदानाचे स्मरण करून, उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.



