जिला

क्रांती दिनानिमित्त नांदेडमध्ये सकल दिव्यांग संघटनेचे आंदोलन

 

 

नांदेड, 9 ऑगस्ट 2025 – शनिवार, क्रांती दिनानिमित्त सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद तिडके बोंढारकर यांच्या बोंढार येथील कार्यालयासमोर आणि नंतर त्यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन सकाळी ठिक 11 वाजता अर्धनग्न अवस्थेत, हलगीच्या तालावर आणि देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून पार पडले. यावेळी सुमारे 30 दिव्यांग महिलांनी आमदारांना राखी बांधून औक्षण केले आणि दरवर्षी “दिव्यांगांचा आमदार” म्हणून खर्च करण्याची ओवाळणी मागणी केली.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हे आंदोलन दिव्यांगांच्या हक्कांसाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले होते.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *