स्पोर्ट्स

ग्यान माता विद्या विहार नांदेड शाळेचा संघ राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र – विभागीय अजिंक्यपद पटकावत नवा इतिहास

 

नांदेड, दि. ८ ऑगस्त / लातूर येथे नुकत्याच पार पडलेल्या सुब्रतो मुखर्जी विभागीय फुटबॉल स्पर्धेत ग्यान माता विद्या विहार नांदेड शाळेच्या फुटबॉल संघाने विजयी कामगिरीची बुलंद झेप घेत, अजिंक्यपदावर नाव कोरले असून, संघाने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे. या अभूतपूर्व यशामुळे नांदेड जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातील मान वाढला आहे.

२० जुलै २०२५ रोजी लातूर येथील एमआयटी शाळेच्या मैदानावर ही प्रतिष्ठित विभागीय स्पर्धा संपन्न झाली. प्रारंभीच्या फेऱ्यांपासूनच ग्यान माता विद्या विहार शाळेचा खेळाडूवृंद आक्रमक व दमदार खेळ सादर करत होता. बाद फेरीत संघाने प्रतिस्पर्ध्यांवर ५-० असा एकतर्फी विजय मिळवला. यानंतरच्या अंतिम लढतीत विद्या माता स्कूलशी चुरशीची झुंज देत ३-२ अशा गोलफरकाने विजय मिळवत नांदेडचा झेंडा अभिमानाने फडकावला.

विजयी संघात प्रज्वल शिंदे, अतिफोद्दीन सिद्धिकी, ईशान आरेपल्लू, भार्गव नंदनवनकर, अवनिश कंधारे, वेदांत पवार, वीरेन गाडेगावकर, मोहम्मद अर्शद हाश्मी, विराज लाहोटी, विश्वजित क-हाळे, निधीश डांगे, वरद पवार, अर्णव चिखलीकर, सयद अब्दूला हाश्मी, तनिश बंग व मोहम्मद अफान या तरुण खेळाडूंचा समावेश असून, त्यांनी सामन्यांदरम्यान सादर केलेल्या कौशल्यपूर्ण खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली.

या संघाच्या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. फेलिक्स पिल्ले, श्री. विष्णू शिंदे, श्री. अलेक्स, सौ. श्वेता ठाकूर व सौ. यदुकृष्णा यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या शिस्तबद्ध खेळी, समन्वय आणि परिश्रमामुळेच हे अभिमानास्पद यश मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

आता ग्यान माता विद्या विहार नांदेड शाळेचा हा उत्साही व जोशपूर्ण संघ १० ऑगस्ट २०२५ रोजी अहिल्यानगर (अहमदनगर) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत नांदेडचे प्रतिनिधित्व करणार आहे. या निमित्ताने शाळेचे प्राचार्य फादर ईग्नाथी, उपप्राचार्य फादर अॅनसन, अधीक्षक फादर आनंद, सिस्टर्स, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देत आगामी स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले.

या विजयामुळे ग्यान माता विद्या विहार शाळेने केवळ विभागीय स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले नाही, तर राज्यस्तरावरही नांदेडच्या क्रीडापटूंचा झेंडा उंचावण्याचा विश्वास जागवला आहे. आता संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा या संघाच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाकडे लागल्या आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *