मराठवाडा

परभणीत राजकीय भूकंप – आलमगीर खान काँग्रेसमध्ये!

दोन वेळा लोकसभा लढवलेले नेते आता बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली

 

परभणी | परभणीच्या राजकारणात आज मोठी हलचल झाली आहे. वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पक्ष (बीएसपी) या दोन वेगवेगळ्या पक्षांकडून दोन वेळा परभणी लोकसभा निवडणूक लढवलेले आलमगीर खान यांनी आज औपचारिकरीत्या काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली झाला.

या बदलामुळे परभणी शहरातील काँग्रेस पक्षाला नवे चेहरे आणि नवे बळ मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माध्यमांशी बोलताना आलमगीर खान म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष अनेक वर्षांपासून आघाडीवर आहे. आमच्याकडे अभ्यासू व अनुभवी नेतृत्व असल्यामुळे आगामी निवडणुकांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.”

अलीकडच्या काळात कोणी भाजपात तर कोणी अजित पवार गटात गेले असले, तरी आलमगीर खान यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नवा रंग भरला आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *