अर्धापूर शहराची ओळख खड्यांचे शहर म्हणून झाली प्रसिद्धी….
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता जनता बेजार आणि परेशान नगर पंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष

अर्धापूर :- प्रतिनिधी – खड्यांचे शहर म्हणून अर्धापूर शहराची जिल्हाभर ओळख होत असून शहरातील अनेक भागांमध्ये मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत.काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अण्णाभाऊ साठे जयंती, गणेशोत्सव,दुर्गादेवी उत्सव आदिंच्या शहरातील विविध रस्त्यांवरून मिरवणूक व शोभायात्रा निघत असते. त्यात शहरात पडलेले खड्डे व त्यामध्ये पावसाचे पाणी साचलेले या दुहेरी संकट व त्रासामुळे एक तर शहरातील जनतेला पायी चालणे,मोटारसायकल व चारचाकी वाहन चालवताना फार भयानक त्रास होवून यातून सर्वजण बेजार व परेशान होत असून त्यातच पुढे येणाऱ्या जयंतीच्या मिरवणूका आणि शोभायात्रा यामध्ये अनुचित प्रकार घडू शकतो यासाठी नगरपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर खड्यांचा बंदोबस्त करावा, अशी अर्धापूर शहरातील जनतेत फार मोठ्या प्रमाणात गंभीर चर्चा होत असताना दिसत आहे.अर्धापूर शहराच्या विकासाची मोठी मोठी स्वप्न दाखवीत स्वतःचा आणि पक्षाचा प्रचार करण्यात सर्व पक्षीय नेते गुंतलेले असताना प्रत्यक्षात शहरातील बहुतांश रस्त्याची वाट लागली आहे,
पावसाळ्यानंतर व पावसाळ्यापूर्वी होणारी कामे नियमित वेळेत झाली नसल्याने पावसाने पडलेले खड्डे व त्या खड्ड्यात जमा झालेले पावसाचे पाणी कायम आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी आता अर्धापूरकरांना नव्या नगरसेवकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे का ? अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.त्यासोबतच वाहनांचे नुकसान आणि वाहन चालकांना पाठ दुखीचा त्रासही होऊ लागला आहे. सध्या अर्धापूर शहरात ड्रेनेजच्या कामामुळे रस्ते खोदल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून काही रस्त्यावर ड्रेनेजमधील घाण पाणी सुध्दा येत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे नगरपंचायत प्रशासनाचे पुर्णपणे साफ दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. अर्धापूर शहरात खड्डे नाहीत असा रस्ता सापडणे अवघड अशी परिस्थिती आहे.नव्याने झालेल्या रस्त्यांना ही अपवाद नाहीत,खड्डे चुकविण्यासाठी दुचाकीस्वरांना मोठी कसरत करावी लागत असून खड्डे चुक वितांना अनेकदा अपघातही होतात.
त्यावरून होणारे वाद पोलीस ठाण्या पर्यंत जातात.पावसाळ्यानंतर रस्ते दुरुस्ती केली जाते. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून शहरातील खड्डे बुजवून त्यामध्ये साचलेले पाणी यावर ताबडतोब उपाययोजना करून आमचा होत असलेला त्रास दुर करावा अशी मागणी जनतेतून होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.शहरातील काही भागात तर नगरपंचायत प्रशासन आहे की नाही ? अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. येथील रस्त्यांकडे सतत दुर्लक्ष केले जाते.आता तरी नगरपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शहरातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरून शहरातील रस्ते,खड्डे,खड्ड्यात साचलेले पाणी,नालीचे व ड्रेनेजचे घाण पाणी,
नगर पंचायत कार्यालया जवळ असलेल्या जि.प.के.प्रा.कन्या शाळा असून त्यामध्ये साचलेले पावसाचे पाणी,शाळा दारूचा व मटक्याचा अड्डा बनली असून वरिल सर्व त्रास,समस्या व परेशानी कडे कोणीही बघायला तयार नाहीत, लोकप्रतिनिधी एकदा निवडून गेले कि ते पुढच्या ५ वर्षांनी मतदान मागायला येतात अशी माहिती आमच्या दैनिक वर्तमानपत्राशी बोलताना नागरिकांनी दिली त्यामुळे लवकरात लवकर रस्ते, खड्डे,खड्ड्यातील पावसाचे पाणी, शाळेतील साचलेले पाणी,दारू व मटक्याचा अड्डा या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यात आल्या नाही तर शहरातील नागरिक मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हाधिकारी, आमदार,खासदार यांना तक्रार देवून आंदोलन करणार आहेत अशी माहिती शहरातील एका शिष्टमंडळाने दिली आहे.



