जिला

चांगलं रस्ता करून देण्यासाठी मुदखेडच्या महात्मा गांधी विद्यालयाचा मोर्चा नगरपरिषद व तहसीलवर धडकला

 

(मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम)

शहरातील महात्मा गांधी विद्यालय ते मुख्य रस्ता डॉक्टर पचलिंग यांच्या हॉस्पिटल पर्यंत तातडीने करावा या प्रमुख मागणीसाठी मुदखेड च्या महात्मा गांधी विद्यालयाचा नगरपरिषद व तहसील कार्यालयावर शिक्षक शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा 26 ऑगस्ट रोजी मोर्चा धडकला नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी दळवी व तहसील कार्यालयात नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांच्याकडे महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने सिमेंट काँक्रेट रस्ता करण्याबाबत लेखी निवेदन सादर करण्यात आले तूर्तास शहरातील महात्मा गांधी विद्यालयाकडे जाणारा रस्ता हा अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर नगरपालिकेची जागा आपली जहागीर समजून काही मंडळींनी अतिक्रमण केले आहे. जिल्हा परिषद शाळा ही अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे .

त्यामुळे महात्मा गांधी विद्यालयाकडे दररोज या रस्त्यावरून येण्या जाण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात मोठी कसरत करावी लागत आहे तालुका मुख्यालय असलेले महात्मा गांधी विद्यालय हे नामांकित विद्यालय असून या विद्यालयात शहरी व ग्रामीण भागातील जवळपास दोन हजार मुले मुली शिक्षण घेतात शाळेकडे जाणारा रस्ता जागोजागी उकडून गेल्यामुळे अपघात होत असून यामुळे विद्यार्थी पालक व शिक्षक वृंद यांना रस्त्या अभावी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

या मागणी करिता नगरपरिषदेकडे मे महिन्यात निवेदन सादर करण्यात आले होते परंतु अद्यापही या मागणीची पूर्तता नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आली नसल्यामुळे तालुकास्तरीय प्रशासनाचे रस्त्याच्या मागणी करिता लक्ष वेधण्यासाठी चक्क महात्मा गांधी विद्यालयाने सिमेंट काँक्रेट रस्ता झालाच पाहिजे या घोषणांनी शहर नगरपरिषद आणि तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

माहिती घेऊन कार्यवाही करू.

मुख्याधिकारी दळवी नगरपरिषदेचा आपण नुकताच पदभार घेतला असून यापूर्वी सदर रस्त्याच्या मागणी विषयी काय कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती घेऊ व निधीची उपलब्धता झाल्यानंतर महात्मा गांधी विद्यालयाकडे जाणारा रस्ता पूर्ण करू अशी प्रतिक्रिया मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाची बोलताना नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी दळवी यांनी दिली .

तहसील कार्यालयात नाय तहसीलदार मारोतराव जगताप यांना महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबुराव नाईक व विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले याप्रकरणी उचित कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाला कळविण्यात येईल असे आश्वासन नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांनी मोर्चेकरांच्या श्रेष्ठ मंडळाला दिले.

या मोर्चात महात्मा गांधी विद्यालयातील बहुतांश शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *