जिला

सततच्या पावसामुळे मुदखेड येथील धनगर टेकडीवरील

पुरातन खंडोबा मंदिर जमीनदोस्त : तहसीलदारांकडून पाहणी

 

 

(मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम)

मुदखेड : शहरातील गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून धनगर टेकडी येथील पुरातन जागृत खंडोबा देवस्थान मंदिर जमीनदोस्त झाले आहे. मंदिराशेजारी असलेल्या घरांना तडे गेले असून सदरील मंदिर तातडीने दुरुस्त करुन देण्यात यावे अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान तहसीलदार व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

मुदखेड तालुक्यात व शहरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे धनगर टेकडी येथील पुरातन जागृत खंडोबा देवस्थान मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. मंदिरांच्या शेजारी असलेल्या भुजंग जळबाजी फुले यांच्या घराचे मोठं नुकसान झाले असून बोरचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मंदिराच्या शेजारी असलेल्या चिमनाजी फुले, बाळू गुंटे, जयवंता कराडे, पिंटू मानिका संबोड यांच्या घराला तडे जाऊन भेगा पडल्या आहेत.

धनगर टेकडी येथील जागृत खंडोबा देवस्थान मंदिर जमीनदोस्त झाल्याची घटना तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना समजताच त्यांनी नगरपालिकेचे माळी, पवार व गटविकास अधिकारी यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहाणी केली. तसेच सदरील घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश तलाठी यांना व नगरपालिका कर्मचारी यांना दिले.

धनगर टेकडी येथील जागृत खंडोबा देवस्थान मंदिराचे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन खंडोबा मंदिर शासनाच्या वतीने उभारण्यात यावे तसेच ज्या घरांना भेगा पडल्या आहेत. त्या लाभार्थींना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष व मराठवाडा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण देवदे, गंगाधर गुंटे, भुजंग फुले, मारोती फुले, शिवाजी बिस्मिले, माराती कमजळे, गजू कमजळे, बाळू गुंटे, रमेश फुले, प्रशांत फुले यांनी तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *