नदीपर्यंत जाणाऱ्या पावसाच्या पाण्यातील अडथळे दूर करा खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रशासनाला सूचना
कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी

नांदेड ः या वर्षी जून महिन्यापासूनच शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट वारंवार येत आहे. जिल्हयामध्ये आता झालेली या वर्षातील ही तिसरी अतिवृष्टी असून यामध्ये शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. विशेषतः गावशिवारातून वाहणाऱ्या छोटया नद्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे जास्तीचे नुकसान झाले आहे. भविष्यातील असे नुकसान टाळण्यासाठी मुख्य नदीपर्यंत जाणाऱ्या या छोटया नद्यांमधील अडथळे तत्काळ दूर करा अशी प्रशासनाला सूचना करतानाच कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा आपण प्रयत्न करु अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी दिली.
अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव, अर्धापूर,पार्डी मक्ता, कारवाडी, पांगरी,रोडगी आदी गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची खा.अशोकराव चव्हाण यांनी पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांच्या नजरेसमोर अतिशय विदारक चित्र दिसून आले. पार्डी मक्ता येथे नव्याने बांधण्यात येणारा रस्त्यावरील पूल दोन्ही बाजूने वाहून गेला आहे. तर महादेव पिंपळगाव येथील शेकडो एकर जमिनीमध्ये पाणीपाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकाच दिवशी 24 तासात 65 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला तर अतिवृष्टी समजल्या जाते. परंतु अर्धापूर तालुक्यातील दाभड मंडळामध्ये तब्बल 168 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. यावरुन शेतकऱ्यांचे किती नुकसान होवू शकते. याचा अंदाज आपणास आला असून ज्या पध्दतीने कोल्हापूर जिल्हयात पंचनामे न करता सरसकट मदत देण्याचा निर्णय झाला आहे.
त्याच धर्तीवर ज्या भागात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्या भागात सरसकट शासकीय मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.पण प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुद्धा लवकर करावेत अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी खा.अशोकराव चव्हाण यांच्या समवेत प्रशासनातील महत्वपूर्ण अधिकाऱ्यांसह भाजपाचे ज्येष्ठ नेते बी.आर.कदम, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, भाजपाचे तालुका प्रभारी किशोर स्वामी, भाजपा जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष योगेश हाळदे, नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीण देशमुख, उपनगराध्यक्ष मुक्तदरखान पठाण, दत्ता पाटील पांगरीकर, राजेश्वर शेट्टे, बाजार समिती संचालक निळकंठ मदने, गजानन कदम, सुभाष किन्हाळकर,
माजी जि.प.सदस्य व्यंकटराव साखरे, रामराव भालेराव, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,सुधाकर कदम, डॉ.लक्ष्मण इंगोले, राजू बारसे,विलास साबळे, युवा मोर्चाध्यक्ष पवन पाटील इंगोले, भाजपा तालुका उपाध्यक्ष नागोराव पा.भांगे, नगरसेवक बाबूराव लंगडे, व्यंकटी राऊत, नामदेव सरोदे, भगवान तिडके, बाळू धुमाळ, परमेश्वर बंडाळे, राजकुमार जाधव, अमोल डोंगरे, अवधूत कदम, नासेरखान पठाण, शंकरराव ढगे, चंद्रमुनी लोणे, उमाकांत सरोदे, हेमंत देशमुख, नामदेव दुधाटे, बालाजी कदम, यशवंतराव राजेगोरे, राजेश लोणे, राजू कल्याणकर, मारोतराव देशमुख, शंकरराव हापगुंडे, ईश्वर कपाटे, कुश भांगे, गुलाब शेख, बीबीशन कांबळे आदींची उपस्थिती होती.



