महाराष्ट्रा

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मालेगाव बॉम्बस्फोट पीडितांच्या कुटुंबियांची घेतली भेट!‎‎

 

मालेगाव : 29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात बॉम्बस्फोट झाला होता. बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली.

‎‎यावेळी “मालेगाव बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा व्हावी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी आहे”, असा विश्वास ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.‎‎

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व माजी आमदार नातिकउद्दीन खतीब, राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, राज्य प्रवक्त्या दिशा पिंकी शेख, राज्य प्रवक्ता तैय्यब झफर यांच्यासह पीडित कुटुंबीय उपस्थित होते.‎‎

वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते तय्यब जफर यांनी काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फोनवर पीडित कुटुंबियांशी संवाद साधला होता. त्यावेळी नातलगांनी ‘आम्हाला न्याय पाहिजे”, अशी मागणी केली होती. ‎‎

यातील अटक आरोपींची एनआयए विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यात भोपाळच्या माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांना मुख्य आरोपी होत्या. या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता. शहरातील भिक्कू चौकात झालेल्या या बॉम्बस्फोटमध्ये 6 मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *