जिला

शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी- शेतकऱ्यांची निवेदन सादर करत मागणी

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम

मुदखेड शहर आणि तालुक्यात दिनांक 28 आणि 29 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणामध्ये अतिव्रष्ट होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा पिकांचा तात्काळ पंचनामा करून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांद्वारे दिनांक 30 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात तालुक्याचे तहसीलदार आनंद देउळगावकर यांना निवेदन देत मागणी केली आहे.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मागच्या 15 दिवसांपासून ई पीक पाहणी ॲप बंद असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची ई पीक नोंद झाली नाही ,त्याचा कुठलाही परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करत असताना होऊ नये आणि एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये , शहरापासून जवळच असलेल्या सिता नदीवरील बंधाऱ्यास फुरसन अडकून पुराच्या पाण्याचा प्रवाह अडून बॅक वॉटर ची समस्या निर्माण होत आहे व त्यामुळे नदी काठील शेतकऱ्याचा शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून शेतीच नुकसान होत आहे यासाठी प्रशासकीय स्तरावर योग्य ती उपाययोजना करत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा नुकसान थांबवावा.

याप्रसंगी ऍडव्होकेट रमेश मेगदे, संदिप मोडवान,गिरीष कोत्तावार,विठल आचार्य,राम आबादर ,देविदास चंद्रे ,सुरेश ढगे,विजय पचलिंग,सचिन चंद्रे ,रामजी कामाले ,आनंदराव ढगे ,सुरेश मेगदे,शिवाजी संबोड ,सतीश मोरे ,सचिन कवळे ,रामदास कमजले,सतीश काळे ,संभाजी ढगे,कैलास चौदंते,शिवाजी को.संबोड सोनू तेलंगे सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *