जिला

शहरातून वाहणाऱ्या कालव्याची साफसफाई व गाळ काढण्याची मागणी

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम

मुदखेड शहरातून वाहणाऱ्रा पेनगंगा प्रकल्पातील कालवा नवी आबादी, मदिना नगर, मिल्लत नगर या भागातून वाहतो दिनांक 28 आणि 29 रोजी मुदखेड शहरात मुसळधार पाऊस कोसळून या कालव्यातून कोसळलेल्या पाण्याचा महापूर जाणवला आणि मदिना नगर परिसरातील वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या घरात कालव्यातून पाणी उलथून शिरकाव केला परंतु कोणतीही जीवित हानी झाली नाही वाहणाऱ्या कालव्यातून गाळ आणि उपसा काढून कालवा निर्मळ करण्यात यावा भविष्यात मुसळधार पावसामुळे कालव्यातून वाहणारा पाण्याचा प्रवाह उलथून नागरिकांच्या घरांची पडझड व नुकसान होता कामा नये यासाठी उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता सुशील चेट्टी यांना निवेदन देत त्वरित कालव्यातून गाळ व इतर प्रकारची साचलेले वस्तू व उपसा करण्यात यावी अशी मागणी केली गेली.

दि. 28 ऑगस्ट रोजी कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह खूप अधिक होता मदिना नगर परिसरातील वास्तव्यस असलेल्या नागरिकांच्या घरात कालव्यातून पाणी उथलून घरात शिरकाव केले
वेळीच स्थानिक प्रशासनांना स्थानिकांनी सूचना केली कर्तव्यदक्ष तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी
स्थळी येऊन पाहणी केली आणि त्वरित संबंधित नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सूचना करत जे सी बी यंत्राच्या माध्यमातून साचलेला गाळ काढून प्रवाह नियमित करण्यात आला.

दिनांक 29 ऑगस्ट रोजी शहरात स्थित असलेले उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निवेदन सादर केले यावेळी पत्रकार अतिक अहेमद, शेख मोईन फूलवाले, संपादक शेख इरफान शेख इमाम यावेळी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *