दसरा, दिवाळी व छूट्या निमित्त नांदेड विभागात विशेष गाड्यांना मुदतवाढ
काही गाड्या आंशिक रद्द, तर काही गाड्या उशिराने सुटणार : रेल्वे जनसंपर्क विभागाची माहिती

नांदेड (प्रतिनिधी) : दसरा, दिवाळी व छूट्या सणांच्या काळात होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातून धावणाऱ्या विशेष गाड्यांना मुदतवाढ दिल्याचे जनसंपर्क विभाग, नांदेड यांनी कळविले आहे. तसेच काही गाड्या आंशिक रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुटणार आहेत.
मुदतवाढ मिळालेल्या विशेष गाड्या :
1. गाडी क्र. 07189 हु.सा. नांदेड – धर्मावरम (शुक्रवार)
अधिसूचित शेवटचा दिवस : 26.09.2025
मुदतवाढ : 03.10.2025 पासून ते 28.11.2025 पर्यंत
2. गाडी क्र. 07190 धर्मावरम – हु.सा. नांदेड (रविवार)
अधिसूचित शेवटचा दिवस : 28.09.2025
मुदतवाढ : 05.10.2025 पासून ते 30.11.2025 पर्यंत
➡️ वरील गाड्या पूर्वीप्रमाणेच वेळापत्रकानुसार धावतील.
आंशिक रद्द गाड्या :
1. गाडी क्र. 12071 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हिंगोली (07.09.2025)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नगरसोल दरम्यान रद्द
ही गाडी नगरसोल येथून हिंगोलीकडे धावेल.
2. गाडी क्र.17687 मनमाड – धर्माबाद (07.09.2025)
मनमाड ते औरंगाबाद दरम्यान रद्द
ही गाडी औरंगाबाद येथून धर्माबादकडे धावेल.
3. गाडी क्र. 17063 मनमाड – काचीगुडा (07.09.2025)
मनमाड ते नगरसोल दरम्यान रद्द
ही गाडी नगरसोल येथून काचीगुड्याकडे धावेल.
उशिराने सुटणाऱ्या गाड्या :
1. गाडी क्र. 17205 साईनगर शिर्डी – काकीनाडा पोर्ट (07.09.2025)
नियोजित वेळ : सायं. 17:00
प्रत्यक्ष सुटण्याची वेळ : रात्री 20:00
म्हणजेच 03 तास उशिरा सुटणार.
2. गाडी क्र. 14621 हु.सा. नांदेड – फिरोजपूर कॅन्ट. (07.09.2025)
नियोजित वेळ : दुपारी 11:50
प्रत्यक्ष सुटण्याची वेळ : दुपारी 12:20
म्हणजेच 30 मिनिटे उशिरा सुटणार.
रेल्वे प्रशासनाचे आवाहन
प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना या बदलांचा विचार करूनच प्रवास करावा, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क विभाग, नांदेड यांनी केले आहे.



