जिला

नगर परिषदेची प्रभाग रचना सत्ताधारी राजकीय पक्षाच्या भल्यासाठी, काँग्रेस पक्षाने लेखी निवेदनाद्वारे प्रभाग रचनेच्या प्रारुपात नोंदविला आक्षेप

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम

मुदखेड नगर परिषदेच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी नगर परिषदेने शहरात एकूण 20 प्रभाग रचनेचा प्रारूप दि 18 ऑगस्ट रोजी
घोषित करण्यात आली होती स्थानिक काँग्रेस पक्षाने घोषित केलेल्या प्रभाग रचनेत अनेक विसंगती असून तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसून 2022 ची प्रभाग रचना स्थानिक राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनेनेही स्विकारला असून 2025 ची शहराची नविन प्रभाग रचना राजकीय प्रभावाखाली तयार करण्यात आली असून सत्ताधारी राजकीय पक्षाला लाभ मिळवूण द्यावा या अनुषंगाने केल्याचा आरोप करत दि. 30 ऑगस्ट रोजी स्थानिक काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कैलास गोडसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगर परिषदेचे प्रतिनिधी तथा कर निरिक्षक महाजन यांना नविन तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूपाचा
2022 चा मॉडल ‘जैसे थे ‘ ठेवण्याची मागणी करत लेखी स्वरूपात आक्षेप नोंदविला.

सादर करण्यात आलेल्या लेखी निवेदनात नैसर्गीक भूगोलाचा समतोलपणा राखला नसून , लोकसंख्येचा संतूलन न राखता 2022 च्या प्रभाग रचनेनुसार मोठ्या प्रभागाची व्याप्ती जास्त असल्याने लोकसंख्या समान ठेवण्यात आली होती परंतु 2025 च्या प्रभाग रचनेत तसे दिसून येत नसल्याची आपल्या निवेदनात नमूद केली, नविन रचनेत सामजिक व सांस्कृतीक त्रुटी आणि विसंगती निर्माण झाली आहे विशेष म्हणजे 10 जून 2025 रोजी शासन आदेशान्वये अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय प्रभागांची विभागणी करु नये व समाजाचा प्रतिनिधीत्व कमी करता कामा नये असे सांगितले असताना नगर परिषदेच्या प्रभाग रचना तयार करणारे कोणतेही सोय सुचकता न बाळगता राजकीय प्रभावाखाली सत्ताधारी राजकीय पक्षाला फायदा मिळवून द्यावा याच हेतूने 2025 ची नवीन प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप करत निष्पक्षपाती धोरणाचा अवलंब न करता पक्षपाती धोरण स्विकारला गेला असल्याचे सांगितले 2022 च्यानुसार जैसी थी प्रभाग रचना ठेवण्यात यावी व सामाजिक बलाबल आणि सामाजिक प्रतिनिधित्व सर्व पातळीवर समतोल राखावे अशी मागणी निवेदनात केली आहे.

याप्रसंगी तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस,
शहर काँग्रेस उपाध्यक्ष सूर्यकांत चौंदते,शहर सचिव अतीख अहमद,शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण,मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते अब्दुल हाजी अब्दुल रशीद मुलतानी,महंमद युसूफ सेठ जनता होटल ,मोईन भाई फूलवाले, शहर सहसचिव अब्दुल्ल लतीफ टेलर,युवक शहर उपाध्यक्ष अविनाश चौंदते,सुभाषराव चौंदते, शहर युवक उपाध्यक्ष अविनाश सोनटक्के ,शहर युवक सचिव वेदांत शेवटे, काँग्रेस कार्यकर्ता संजय बोकेफोड,संतोष चमकुरे, गोविंद बळे सह आदी काँग्रेस कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *