मराठवाडा

भारतरत्न श्री. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या 164 व्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा केला

 

दक्षिण मध्य रेल्वे अभियंता संघ, नांदेड विभाग यांच्या वतीने भारतरत्न श्री. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या 164 व्या जयंतीनिमित्त आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी अभियंता दिन साजरा करण्यात आला.

या निमित्ताने “रेल्वे सुरक्षेत अभियंत्यांची भूमिका” या विषयावर सेमिनार रेल्वे इन्स्टिट्यूट, विभागीय कार्यालय परिसर, नांदेड येथे दुपारी 12.00 ते 16.00 वाजेपर्यंत पार पडला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), नांदेड विभाग, श्री. राजेंद्र कुमार मीना, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (एडीआरएम), नांदेड विभाग हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. व्ही. सुजित कुमार, वरिष्ठ विभागीय अभियंता /समन्वय/नांदेड सन्माननीय उपस्थित , श्री. मो. नुरुद्दिन आबिद, उपमुख्य अभियंता/गतीशक्ती , श्री. एन. सतीश कुमार, विभागीय अभियंता आणि श्री. अपूर्व वशिष्ठ, विभैय अभियंता हे उपस्थित होते.

सेमिनारमध्ये मान्यवर वक्त्यांनी भारतीय रेल्वेच्या सुरक्षाविषयक उपाययोजना व अभियंत्यांचे योगदान यावर आपली मते व्यक्त केली. सहभागी अभियंत्यांनी रेल्वे सुरक्षेसंबंधी नवनवीन कल्पना आणि सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा केली.

दक्षिण मध्य रेल्वे अभियंता संघ, नांदेड विभाग सर्व मान्यवर, सदस्य व सहभागी यांचे आभार मानले की त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडवून श्री. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *