जिला

शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा योग्य हमीभाव का मिळत नाही

माजी आमदार बच्चू कडू यांची रोहीपिंपळगाव येथे सरकारवर जोरदार टीका

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / मुदखेड तालुक्यात मौजे रोही पिंपळगाव येथे दि.१५ सप्टेंबर २०२५ महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांची शेतकरी, शेतमजूर हक्क यात्रा व शेतकरी,शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार,वंचित समाजाच्या हक्कासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या जाहीर सभेच्या प्रथमता माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांनी महापुरुषांच्या तेल चित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

तसेच मुदखेड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने आमदार बच्चुभाऊ कडू यांचे ढोल ताशाच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करत भव्य सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार बच्चुभाऊ कडू यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्याच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.”शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा योग्य हमीभाव का मिळत नाही?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख शंकरराव पाटील शिंदे रोहित पिंपळगावकर, प्रहार दिव्यांग महिला तालुका अध्यक्ष सौ.केशरताई शंकरराव पाटील शिंदे,माजी तालुका अध्यक्ष अनिल शेट्टे पाटील राजवाडीकर,सरपंच बालाजी भुजंगराव शिंदे, उपसरपंच प्रल्हाद हौसाजी शिंदे, यांच्यासह मुदखेड तालुक्यातील व रोही पिंपळगाव येथील नागरिक महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *