क्राईम

विश्वासघाताचा धक्कादायक प्रकरण बैतुल उलूम उर्दू माध्यमिक शाळा घडले

 

शिवाजीनगर प्रतिनिधी : शहरातील बैतुल उलूम उर्दू माध्यमिक शाळा, नई आबादी नांदेड येथे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिनांक 16 एप्रिल 2025 ते 11 जून 2025 या कालावधीत विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या शैक्षणिक अभिलेखांमध्ये गंभीर गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

सदर शाळेत प्रभारी मुख्याध्यापक मो. अब्दुल जमीर मो. अब्दुल खालेक व कनिष्ठ लिपिक सलाम चाऊस यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. शासनाने विद्यार्थ्यांची ट्रान्सफर सर्टिफिकेट (टी.सी.), निर्गम उतारे व इतर अभिलेख सांभाळण्याची जबाबदारी या दोघांकडे सोपवली होती. नियमांनुसार हे अभिलेख लगतच्या शाळेत वर्ग करून त्याचा अहवाल सादर करणे आवश्यक होते. मात्र, दोन्ही आरोपींनी संगनमत करून अभिलेख पुढील शाळेत जमा न करता ते थांबवून ठेवले.

या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले असून, पालकवर्ग व शैक्षणिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. ही बाब अन्यायकारक व विश्वासघात करणारी ठरल्याने संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

या संदर्भात फिर्यादी रामचंद्र पांडुरंग पाचंगे (वय 49 वर्षे, व्यवसाय : उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद नांदेड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 346/2025 कलम 316(2), 3(5), बीएनएस-2023 अन्वये दाखल करण्यात आला असून, तपास पो.उपनि. श्रीमती गायकवाड (मो.नं. 7373110303) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या प्रकारामुळे शैक्षणिक अभिलेखांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, जिल्ह्यातील शिक्षण विभाग हादरला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *