तांत्रिक कामगार मेळावा आणि सत्कार समारंभ उत्साहात

नांदेड : महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेतर्फे तांत्रिक कामगारांचा मेळावा व सत्कार समारंभ बुधवारी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस शेख मुजिबुर रहमान यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी कामगारांचे मनोबल वाढविले. तसेच माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार अमर राजूरकर, आमदार आनंदराव बोंढारकर, राजेंद्र पवार, राजाराम माने (मुख्य अभियंता, महावितरण नांदेड झोन), भाऊसाहेब भाकरे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना) व हाजी सय्यद झहीरुद्दीन (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना) यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
मेळाव्यात तांत्रिक कामगारांच्या हक्क, समस्या, सुविधा व सुरक्षिततेबाबत सविस्तर चर्चा झाली. ज्येष्ठ कार्यकर्ते आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.
या मेळाव्यामुळे नांदेड जिल्ह्यातील तांत्रिक कामगारांमध्ये एकोपा, आत्मविश्वास आणि संघटनेशी दृढ नाते अधिक बळकट झाले.



