जिला

कानपूर येथील मुस्लिम युवकांवरील गुन्हे रद्द करा प्रकरणाची चौकशी करत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा,

युवकांनी आय लव यू मोहम्मद फलक झळकविले

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम

मागील आठवड्यात उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर जिल्ह्यातील जश्न इदे मिलादुन्नबी च्या मिरवणुकीत मुस्लिम समाजातील २५ युवकांवर मिरवणुकीत आय लव यू मोहम्मद असे फलक हातात झळकताना असताना कानपूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून युवकांवर गुन्हे दाखल करत अटक करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता शहरातील तहसील कार्यालयात सकल मुस्लिम समाजाने निवेदन देत युवकांवरील गुन्हे रद्द करण्यात यावे आणि प्रकरणाची सखोल चौकशी करत दोषींवर कारवाई करण्यात येण्याची मागणी केली महामहीम राष्ट्रपती यांना तहसील प्रशासनाच्या माध्यमातून यावेळी तहसीलदार डॉक्टर आनंद देऊळगावकर आणि पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी समाजाकडून निवेदन स्वीकारले.

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ आणि २६ च्या अनुसार प्रत्येक भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र असून प्रत्येक नागरिकांना आपल्या धर्मानुसार समाजात धार्मिक विधी पार पाडण्याचा अधिकार असून व धार्मिक प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार असताना कानपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने मुस्लिम युवकांवर दाखल केलेले गुन्हे हे बेकायदेशीर असून त्वरित हे गुन्हे रद्द करण्यात यावे आणि आणि संबंधित प्रकरणाची सखोल चौकशीत करत पोलीस प्रशासनाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी सकल मुस्लीम समाजातील धार्मिक गुरु मुफ्ती सुलेमान हाफीज इमरान रजा
मौलाना जमील, हाफीज अतिक रेहमान,हाफीज रिजवान ,हाफीज याहया, हाफीज हारुण ,हाफिझ शमशिर सह , सामाजिक कार्यकर्ते , राजकीय पुढारी आणि युवकांची मोठया संख्येत उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *