जिला

जमील खान गुत्तेदार उमरा धार्मिक विधी यात्रेसाठी रवाना

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / शहरातील मदिना नगर येथील रहिवाशी जमील खान गुत्तेदार इस्लाम धर्मियांच्या पवित्र स्थळ असलेले सौदी अरेबिया येथील मक्का मदिनेसाठी रवाना झाले इस्लाम धर्मियांच्या धार्मिक विधी पैकी असलेली एक विधी म्हणजे उमरा ही विधी पूर्ण करण्यासाठी नुकतेच सौदी अरेबिया कडे रवाना झाले.

इस्लाम धर्मात तोहिद,नमाज ,रोजा ,जकात आणि आर्थिक परिस्थिती अनुकूल असल्यास हजची यात्रा करणे हे बंधनकारक असून व इस्लाम धर्मियांच्या धार्मिक विधी पैकी उमरा सुद्धा एक विधी असून इस्लाम धर्मियांचे अनुयायी ही विधी पार पाडण्यासाठी आयुष्यातून एकदा पवित्र स्थळ असलेले मक्का मदिना या ठिकाणी भेट देतात आणि दर्शन करत विधी पार पाडतात.

जमील खान गुत्तेदार यांना शुभेच्छा देत देशात सुख-समृद्धी राष्ट्रीय एकात्मता सामाजिक सलोखा अबाधित रावे यासाठी प्रार्थना करण्यासाठी सांगण्यात आले यावेळी मोईन भाई फुलारी, पत्रकार अतीख अहेमद, अफरोज बागवान, तालुक्यातील प्रसिद्ध हकीम सय्यद जलाल लाला, ताहेर भाई कोथमिरवाले, नाहेद मेकॅनिक,इब्राहिम फुलारी, मुन्ना भाई ,महेबुब भाई, युसुफ भाई थूल्ली, खयूम मेस्त्री सह आदींची यावेळी उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *