जिला

लोहा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय आढावा बैठक उत्साहात पार

 

लोहा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक तसेच पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा अमित राठोड, जिल्हा कृषी अधिकारी निलकुमार आईतवाडे, जिल्हा पशुधन विकास अधिकारी घुले, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी थोरात, गटविकास अधिकारी कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, दिनेश तेलंग यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक व शिक्षक उपस्थित होते.

बैठकीत पंचायत राज अभियानाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन आगामी कार्ययोजना निश्चित करण्यात आली. गावोगाव विकासकामे गतीने राबवण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय साधावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले. छायाचित्र : विनोद महाबळे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *