जिला
लोहा : शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोहा (प्रतिनिधी) : शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून हे कुत्रे गल्लीबोळांपासून ते मुख्य रस्त्यांवर झुंड करून फिरताना दिसत आहेत. अचानक हल्ला करण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः शाळेत जाणारी लहान मुले, सकाळी चालणारे जेष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग या कुत्र्यांच्या त्रासामुळे भयभीत झाले आहेत. काही ठिकाणी पादचारी आणि दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याची उदाहरणेही समोर आली आहेत.
याबाबत नागरिकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नगरपालिकेकडे केली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. – छायाचित्र : विनोद महाबळे



