मराठवाडा

परभणीत ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा…!

 

सरसकट पंचनामे करत हेक्टरी ५० हजार तात्काळ मदत द्या समस्त शेतकरी बाधवाची परभणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सततचा पाऊस, ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीपिके, जनावरे, घरे आणि संपत्ती वाहून गेल्याने शेतकरी अक्षरशः उघड्यावर पडले आहेत. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

सदरील मोर्चा शुक्रवार दुपारी साडेबारा वाजता सुमारास शहरातील संमत जिनिंग परिसरातून निघाला व गव्हाणे चौक नारायण चाळ स्टेशन रोड विसा कॉर्नर या मार्गावरून पायी जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला

निवेदनात शेतकऱ्यांनी नमूद केले आहे की, पंजाब राज्याने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी., गोदावरी, ओढे, नाले व बॅकवॉटरमुळे खरडून गेलेल्या शेतीला NDRF च्या निकषानुसार भरीव नुकसान भरपाई द्यावी.,पिकविमा कंपनीच्या बदललेल्या ट्रिगरमध्ये तातडीने बदल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आदी मागण्या करण्यात आल्या.

“शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच पावसाच्या पाण्याने हिरावून नेला आहे. जनावरे वाहून गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. अशा संकटाच्या काळात शासनाने तातडीने पाऊल उचलले नाही, तर आत्महत्येच्या घटनांत वाढ होईल,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ही मागणी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. निवेदनावर बाळासाहेब रेंगे, गणेश घाडगे, आशीष वाकोडे आदी शेतकरी बांधवांच्या सही आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *