क्राईम

करडखेडवाडी येथे गांजाच्या झाडांची लागवड उघड मुद्देमाल जप्त

 

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील करडखेडवाडी शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई करत अमली पदार्थ गांजाची लागवड उघड केली आहे. आरोपी बालाजी रुक्माजी कोंकेवार (रा. करडखेडवाडी, ता. देगलुर, जि. नांदेड) याच्या शेतातून गांजाची 95 झाडे, वजन 14 किलो 150 ग्रॅम, किंमत अंदाजे 2 लाख 83 हजार रुपये** असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक नांदेड श्री. अभिनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन फ्लश आउट मोहिमेअंतर्गत करण्यात आली. त्यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश देगलुर पोलीस निरीक्षकांना दिले होते.

दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी गुन्हे शोध पथकास गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. मारोती श्रीराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. या कारवाईत नायब तहसीलदार श्री. पदमावार, दोन शासकीय पंच, फोटोग्राफर व इलेक्ट्रॉनिक काटा धारक उपस्थित होते. तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लपवून ठेवलेली आढळली.

सदर मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *