क्राईम
मोटरसायकल चोरास परभणी स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

परभणी (प्रतिनिधी) : परभणी शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांत वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे यश मिळाले असून, शुभम पांडुरंग पंडित (रा. खानापूर फाटा) यास ताब्यात घेण्यात आले आहे.
शिताफतीने पकडलेल्या आरोपीची चौकशी केली असता त्याने परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाणे हद्दीतील दोन मोटरसायकल चोरी प्रकरणात सहभाग असल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी संबंधित मोटरसायकली जप्त केल्या असून आरोपीस पुढील कारवाईसाठी नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



