नांदेडचे सुमित पेटकर शासकीय औषधनिर्माण अधिकारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी!

नांदेड: नांदेड जिल्हा परिषदेतील श्री सुमित प्रभाकर पेटकर यांची शासकीय औषधनिर्माण अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष श्री योगेश जोशी यांनी तसे पत्र काढुन त्यांची निवड घोषित केली आहे. त्याबद्दल श्री पेटकर यांनी श्री योगेश जोशी, राज्याध्यक्ष तसेच श्री अविनाश देशमुख, माजी राज्याध्यक्ष यांचे आभार मानले
त्यांच्या या निवडीमुळे संघटनेच्या कार्यात आणि औषधनिर्माण अधिकारी यांच्या प्रश्नांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
पेटकर यांचा व्यापक अनुभव श्री. पेटकर हे सध्या महाराष्ट्र औषधनिर्माण अधिकारी संघटना, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. तसेच, त्यांनी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेतही सक्रिय योगदान दिले आहे. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद अनेक वर्षे यशस्वीपणे भूषवले आहे. याव्यतिरिक्त, ते कमल फाउंडेशन NGO, नांदेड मार्फत मागील १० वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
मुख्य उद्दिष्टे
राज्य उपाध्यक्ष म्हणून श्री. पेटकर यांचे मुख्य उद्दिष्ट औषधनिर्माण अधिकारी यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांचे वेतन उंचावणे हे असणार आहे. त्यांच्या बहुआयामी अनुभवाचा संघटनेला आणि औषधनिर्माण अधिकारी वर्गाला फायदा होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.



