जिला
लोहा तालुक्यात अतिवृष्टीमुळे भीमा नदीला महापूर – नागरिकांचे मोठे नुकसान

लोहा (प्रतिनिधी) – कालपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे लोहा तालुक्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. जुन्या लोहा शहरातून वाहणाऱ्या भीमा नदीला भयंकर पूर आल्यामुळे नदीकाठच्या वस्ती भागांमध्ये पाणी घुसले आहे.
अनेक नागरिकांच्या घरात पूरपाणी शिरल्याने घरगुती साहित्य, धान्यसाठा, फर्निचर व इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर घरांची भिंती व ढोली भाग पाण्याच्या प्रचंड लोटाने कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. प्रभावित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नुकसानीचा अधिकृत पंचनामा करण्यासाठी महसूल विभागाने पाहणी मोहीम हाती घेतली आहे. छाया विनोद महाबळे



