नांदेड पोलीस दलातील दोन पोउपनि व एक अंमलदार सेवानिवृत्त

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड पोलीस दलातील दोन ग्रेड पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस अंमलदार हे नियत वयोमानानुसार 30 सप्टेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
मा. श्री. अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्तांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मा. श्री. कुमार यांनी सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदारांनी कुटुंबियांना वेळ द्यावा, आरोग्याची काळजी घेत सुखी आणि आनंदी जीवन जगावे असा सल्ला दिला.
हा समारंभ मंथन हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे पार पडला. या प्रसंगी सौ. डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उपअधीक्षक (मु.) व एसडीपीओ कंधार, श्री. जगदीश मंडलवार, पोनि कल्याण, श्री. जे. ए. गायकवाड, पोउपनि व जनसंपर्क अधिकारी नांदेड यांच्यासह अनेक अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मपोकॉ/ रूक्मीण कानगुले यांनी केले. आयोजन पोकॉ/ मारोती कांबळे, रविंद्र राठोड (पीआरओ कार्यालय), मपोकॉ/ सविता भिमलवाड (पोलीस कल्याण विभाग) यांनी केले.
सेवानिवृत्त अधिकारीयांचे नाव
पोउपनि श्री. सुर्यभान दिगांबर कागने – नियंत्रण कक्ष, नांदेड
पोउपनि श्री. केशव विश्वनाथ चाट्टे – गुरुद्वारा सुरक्षा पथक
पोहेकॉ श्री. दत्ता जयवंतराव गिते – पोलीस ठाणे, लोहा



