हेल्थ

नांदेडला उभारणार २०९ कोटींचे व १५० खाटांचे कर्करोग रुग्णालय,

मंत्रिमंडळाचा निर्णय; खा. अशोकराव चव्हाणांचा पाठपुरावा यशस्वी

 

 

नांदेड, दि. ३० सप्टेंबर २०२५:

नांदेडला कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार सुविधांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय भाजप महायुती राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी खा. अशोकराव चव्हाण यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत कर्करोगासाठी महाराष्ट्रात त्रिस्तरीय समग्र उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे त्यामध्ये नांदेडचाही समावेश करण्यात आला आहे. या निर्णयानुसार नांदेडसह राज्यातील ९ शहरांमध्ये ‘एल-२’ वर्गाची उपचार सुविधा असलेली रुग्णालये उभारली जाणार आहेत. नांदेडमध्ये प्रस्तावित कर्करोग रुग्णालयाचा अंदाजित खर्च २०९ कोटी रुपये असून, या रुग्णालयात १०० खाटांचा आंतररुग्ण विभाग तर ५० खाटांचा दैनंदिन उपचार विभाग असणार आहे. या ठिकाणी सर्जिकल ऑन्कोलॉजी (कॅन्सर शस्त्रक्रिया), कीमोथेरपी व रेडिएशन थेरपी उपचार उपलब्ध असेल. या शिवाय या रुग्णालयात स्पेशलिस्ट डॉक्टर्स (ऑन्कोलॉजिस्ट्स) सुद्धा नियुक्त केले जाणार आहेत. या रुग्णालयाच्या उभारणीनंतर गंभीर परिस्थितीतील रुग्ण वगळता इतर बहुतांश कर्करोगग्रस्त रुग्णांचा नांदेडमध्ये योग्य उपचार करणे शक्य होणार आहे.

खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड शहर व जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक उन्नत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यासाठी त्यांच्याकडून दोन्ही स्तरावर पाठपुरावा देखील सुरु आहे. नांदेडला उभारण्यात येणारी कर्करोग विशेषोपचार सुविधा देखील त्याच पाठपुराव्याचे फलित आहे. या निर्णयाबद्दल खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *