अशोकरावजी चव्हाण यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना मारण्याची जी धमकी देण्यात आलेली आहे व त्यांच्या लेटर पॅड वरती चुकीचा मजकूर छापून मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न समाजकंटकांनी केलेला आहे यासाठी वसमतच्या काँग्रेस टीम तर्फे उपविभागीय अधिकारी वसमत यांच्यामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या सुरक्षित वाढ करून ती झेड प्लस सुरक्षा करावी असे निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित अब्दुल हफिज अब्दुल रहमान (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) शेख अलीमुद्दीन (शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी वसमत राजाराम खराटे (तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी वसमत) रियाज कुरेशी (माजी उपनगराध्यक्ष वसमत) ऍड ऋषिकेश देशमुख (मा. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत) राजू दादा एंगडे (उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसi कमिटी सामाजिक न्याय विभाग) मुन्ना मसूर माजी नगरसेवक , नगरसेवक नदीम सौदागर, हारुण दालवाले शहराध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, तोहीद अबजल,अरविंद कठाळे, अनिस कूरेशी, आवेज अन्सारी,सिध्दार्थ मोरे,काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.



