न्यायधिशावर बूट उगरण्याच्या कृतीचा पत्रकारांकडून जाहीर निषेध

मुदखेड प्रतिनिधी: हकीम
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मा.भूषण गवई यांचेवर एका वकीलाने न्यायालयातच बूट उगारल्याने
देशातील बहुसंख्य लोकांच्या भावना दुखवल्या आहेत.धर्मांध वकीलाच्या कृत्याचा सर्वत्रच निषेध होत आहे.त्या अनुषंगाने तालुका मराठी पत्रकार परिषद मुदखेड पत्रकारांच्या वतीने देखील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयात एका तक्रारी निवेदनाची नोंद करण्यात आली आहे.तसेच तालुका तहसीलदार यांच्या माध्यमातून निषेधास पात्र समाज कंठकावर कठोर कार्यवाहीची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश झाल्या पासून (सी जे आय) भूषण गवई यांनी संविधानाला अनुसरून बरेच असे निर्णय घेतले आहेत.
त्यामुळे संविधानिक व्येवस्थे विरोधी बऱ्याच संघटनाणी त्यांना सोशल मीडियावर बऱ्याच वेळा ट्रोल केलेलं आहे.गत दशकापासून यात कांही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते.त्याचाच परिणाम म्हणजे दि.६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० सव्वा आकरा वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयच्या एका सुनावणी दरम्यान लोकशाहीला काळिमा फसणारा प्रकार घडला.प्रस्तूत न्यायालयाचे वकील पायातला बूट काढून न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने फेकणार तेवढ्यात तेथील सुरक्षा कर्मीने त्याला ताबडतोब ताब्यात घेतले.ही घटना सोशल मीडिया माध्यमाद्वारे वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे बहुसंख्यक धर्म निरपेक्ष लोकात असंतोष पसरला आहे.
बीजेपी सत्तेत आल्या पासून ज्या ज्या वेळी संविधान बदलण्या सारख्या चर्चा समाज माध्यमावर आल्या त्या त्या वेळी सरकारने अशा अफवाचं खंडण केलं आहे. मात्र एका धर्म व्यवस्थेनिगडित नारे देत बौध्द समाजाच्या न्यायाधीशांना एका शिक्षित वकीलाने सर्वोच्च न्यायालयात बूट उगारावा हे संकेत नेमके काय आहेत यावरही मंथन होणं गरजेचं आहे.आज देश असो किंवा गाव लोकशाही व्यवस्था आहेच की नाही या विषयी लोकांत संभ्रम आहे.
अशा संविधान विरोधी कृत्याचा सर्वत्रच निषेध होत असतांना मुदखेड तालुका पत्रकार परिषदेच्या वतीने तालुक्याचे संबंधित तहसीलदार यांच्याकडे दि. ७ ऑक्टोबर रोजी सदर घटनेच्या निषेधार्थ एक निवेदन देऊन धर्मवेड्या वकीलावर कठोर कार्यवाही व्हावी या मागणीचा संदेश सरकार पर्यंत पोहचावा अशी मागणी केली आहे.
यावेळी या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हा सहसचिव ईश्वर पिनलवार, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौदंते यांच्यासह देवानंद गुंजाळ, उत्तम हनुमंते, साहेबराव गागलवाड, दिनेश शर्मा, साहेबराव हौसरे, अतिक अहमद, संतोष दर्शनवाड, नामदेव राहेरे, शेख जब्बार, दमदाता कांबळे, अब्दुल रझाक, अमोल टेकले, संतोष सावंत, हफीज कुरेशी, महंमद हकीम आणि मुदखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



