क्राईम

वेअरहाऊस फोडून हळद चोरी करणारे तिघे आरोपी जेरबंद – ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी

 

 

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यातील MIDC परिसरात घडलेल्या हळद चोरी प्रकरणाचा छडा लावत नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने तिघा आरोपींना जेरबंद करून चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

बालाजी किशन गळापडे (वय ४२ वर्षे, व्यवसाय – हमाली, रा. बाभुळगाव, ता. जि. नांदेड), विनोद मधुकर कांबळे (वय ३४ वर्षे, व्यवसाय – चालक, रा. दिक्षा नगर, बळीरामपूर, ता. जि. नांदेड), गजानन कचरू पवार (वय ४८ वर्षे, व्यवसाय – चालक, रा. मरडगा, ता. हदगाव, जि. नांदेड, ह.मु. गुरुवार बाजार, सिडको, नांदेड)

हळदीचे ३३ कट्टे- किंमत अंदाजे १,५०,०००/- अशोक लिलँड कंपनीचे वाहन (क्र. MH 26 CH 0139) – किंमत अंदाजे ५,००,०००/- एकूण मुद्देमाल : ६,५०,०००/-

पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील चोरी, घरफोडी आणि अन्य मालमत्ता गुन्ह्यांचे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर महाजन फुड प्रॉडक्ट्स वेअरहाऊस, MIDC नांदेड येथे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश करून हळदीचे ३३ कट्टे (किंमत सुमारे १.५ लाख रुपये) चोरीस नेल्याची तक्रार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पो.उ.नि. ज्ञानेश्वर मटवाड व त्यांचे सहकारी अंमलदार पेट्रोलिंगदरम्यान दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १२:२७ वाजता MIDC परिसरात गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, वर नमूद आरोपी चोरीचा हळदीचा माल अशोक लिलँड वाहन (MH 26 CH 0139) मध्ये ठेवून तुप्पा पाटी ते गोपाळचावडी रस्त्यावर विक्रीच्या उद्देशाने थांबले आहेत

पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी संगनमत करून महाजन फुड प्रॉडक्ट्स वेअरहाऊस फोडून हळदी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *