मुंबई (CSMT) – करीमनगर (KRMR) – मुंबई (CSMT) दरम्यान विशेष रेल्वे गाडीची सोय

सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – करीमनगर (KRMR) दरम्यान एक विशेष वातानुकूलित रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी एक फेरी पूर्ण करेन.
गाडीचे तपशील : गाडी क्र. 01021 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – करीमनगर (वातानुकुलीत) विशेष
•प्रस्थान :शिवाजी महाराज टर्मिनस वरून दिनांक 11.10.2025 रोजी रात्री 00:20 वाजता सुटेल
•आगमन : करीमनगर येथे त्याच दिवशी सायं. 16:05 वाजता पोहोचेल
गाडी क्र. 01022 करीमनगर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (वातानुकुलीत) विशेष
•प्रस्थान : करीमनगर वरून दिनांक 11.10.2025 रोजी सायं. 17:30 वाजता सुटेल
•आगमन : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 12.10.2025 रोजी दुपारी 13:50 वाजता पोहोचेल
गाडीचे थांबे (दोन्ही दिशांना): दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, आर्मूर, मेटपल्ली, कोरटल व करीमनगर. गाडीची रचना: 22 वातानुकुलीत (एलएचबी) डबे



