विधी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

नांदेड :- उध्दव सरोदे – शहरातील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड येथे भारताचे माजी राष्ट्रपती,भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती महाविद्या लयाच्या प्राचार्या डॉ.विना पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि उपस्थित विद्यार्थी यांनी सर्वप्रथम प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.त्यानंतर ग्रंथपाल डॉ. राजीव वाघमारे यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागची महत्त्वाची भूमिका व्यक्त केली व प्रत्येकाच्या जीवनात पुस्तक वाचनाचे महत्व विषद करीत माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात पारंपारिक संतुलित वाचन करावे असे आव्हान केले.
प्रस्तुत वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी या उद्देशाने ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथालयातील चालु वर्षातील अद्यावत माहिती देणाऱ्या नियतकांलिकांचे प्रदर्शन सुध्दा आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्वांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.तसेच डॉ.कलाम यांच्या स्मृतीस उजाळा मिळावा,विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून महाविद्यालयाच्या टेलीग्राम या सामाजिक प्रसार माध्यमातुन डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची माहिती व वाचनाचे आयुष्यातील
सकारात्मक फायदे या विषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्राचार्या डॉ.विना पाटील यांनी ग्रंथालया तर्फे आयोजित प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी आणि अवांतर वाचनासाठी दैनदिन जीवनातील किमान एक तास द्यावा असे आव्हाण केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.



