जिला

विद्यमान ग्रा.पं.सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ.साक्षी सचिन देशमुख पार्डी (म.) पंचायत समिती गणाच्या प्रबळ दावेदार.

 

अर्धापूर :- उध्दव सरोदे – नव्यानेच झालेल्या लहान ता.अर्धापूर जि.नांदेडच्या जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गण म्हणून पार्डी (म.) हा नव्याने तयार झालेला गण असून त्यासाठी अनेक पक्षातील व अनेक संघटनातील पदाधिकारी कार्यकर्ते निवडणुकीला समोर जाण्याची तयारी करीत असून त्यातच पार्डि (म.) गावाचे प्रसिद्ध तंटामुक्तीचे अध्यक्ष व अर्धापूर तालुक्यात गाव खेड्यात सर्वांना परिचित असणारे,वेळप्रसंगी अहोरात्र सर्वांना मदत करणारे व लोकमान्य एज्युकेशन सोसायटी अशा जुन्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सदाशिवराव देशमुख यांच्या सुनबाई व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदवीधर सेलचे प्रदेश सचिव व सामाजिक कार्यकर्ते ॲड.सचिन सदाशिवराव देशमुख यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. साक्षी सचिन देशमुख ह्या येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ॲड.सचिन देशमुख यांच्या कार्यालयाला अचानक पणे हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांची सदिच्छा भेट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे तालुक्यातील पदाधिकारी यांची अचानकपणे वकिल साहेबांना भेट देणे व त्यावरून त्यांच्या संपर्कात झालेली वाढ पाहता ते भविष्यात धनुष्यबाण हातात घेतील की दादांच्या घडीत वेळ पाहतील हे येणारा काळच ठरवेल.ॲड.सचिन देशमुख हे अगोदर पासूनच जनतेच्या प्रत्येक कामात मग ते सुख दुःख असो का सार्वजनिक तथा सामाजिक काम अथवा इतर कोणतेही काम ते अहोरात्र जनतेला केंद्रबिंदू मानून पुर्ण करतात तसेच कोरोना काळात तर त्यांचे संपूर्ण कुटुंब हे घरात न बसता त्यांनी त्या मरण्याच्या काळात सुध्दा आपल्या जीवाची

पर्वा न करता वेगवेगळे उपक्रम राबवले ज्यामध्ये रस्त्याने पायी जाणारे वाटसरू,पोलिस,डॉक्टर व इतर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली,त्यांचे स्वतःचे गावं पार्डीला २ वेळा पुर्णपणे स्वखर्चातून सॅनिटायजर केले,मास्क वाटप आदि मदतीचे व लोकांची गरजेनुसार कामे करून उपक्रम राबवले.त्यामुळे पार्डी (म.) पंचायत समिती गनात त्यांच्या पत्नी सौ.साक्षी सचिन देशमुख ह्या प्रबळ दावेदार आहेत.सौ.साक्षी सचिन देशमुख ह्या पंचायत समिती अर्धापूरच्या निवडणूकीसाठी जनतेने आग्रह केल्यामुळे पुर्णपणे सज्ज झाल्या असून मतदार जनता म्हणते की आम्ही १००% त्यांना पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विजयी करणारच असा निश्चय केला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *