क्राईम

बँकेत फसवणूक – चेकवरील नाव बदलून दोन लाख रुपयांचा गंडा

स्टेट बँक ऑफ इंडियामधील सर्व्हिस मॅनेजरची दिशाभूल; दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल

 

वजिराबाद (प्रतिनिधी) – शहरातील डॉक्टर लेन, कलामंदिर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये दोन अनोळखी इसमांनी संगणमत करून बँकेतील कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत दोन लाख रुपयांचा चेक चोरल्याची व त्यावरील नाव बदलून अन्य बँकेत जमा करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १.२८ ते १.३८ दरम्यान घडली. बँकेतील सर्व्हिस मॅनेजर आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांची फसवणूक करून आरोपींनी ‘चेक स्लीपवरील खाते क्रमांक दुरुस्तीचा बहाणा’ केला आणि त्या दरम्यान नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शोएब खान शकील खान यांच्या नावावरील रु. २,००,०००/- चा चेक हातोहात चोरून नेला.

यानंतर आरोपींनी नमूद चेकवरील नाव बदलून तो अमर टेपेकर या नावाने दाखल केला व बँक ऑफ बडोदा, आनंदनगर शाखा, नांदेड येथे तो जमा करून फसवणूक केली. या प्रकारानंतर बँक प्रशासनाने सर्व व्यवहार तपासले असता प्रकरण उघडकीस आले.

या संदर्भात राजू अनंत कदम (वय ३९ वर्षे, व्यवसाय – नोकरी, शाखाधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३७/२०२५ नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा कलम ३१८(४), ३३६(३), ३(५) बीएनएस-२०२३ कायद्यानुसार दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि माडगे (मो. नं. ७५०७५२७४७९) हे करीत आहेत. पोलिसांकडून आरोपींच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज व इतर पुरावे गोळा करण्यात येत असून, या फसवणुकीमागील रॅकेटचा शोध सुरू आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *