क्राईम

अवैध शस्त्रसाठा जप्त – स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड पोलिसांनी अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्या एका इसमावर कारवाई करत एकूण ११,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुना मोंढा परिसरात केली.

आरोपीचे नाव: आदित्य दुर्गासिंह ठाकुर (वय २० वर्षे), रा. गणेश टॉकीज रोड, लोहार गल्ली, नांदेड.

पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांनी नांदेड जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी सपोनी वि. रे. ह. घोगरे (खंडणीविरोधी पथक, नांदेड) यांना विशेष कार्यवाहीचे आदेश दिले.

सपोनी घोगरे व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जुना मोंढा येथे छापा टाकला. त्या वेळी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, लोहार गल्ली येथील आदित्य ठाकुर हा आपल्या घरात अवैध शस्त्रसाठा बाळगून असल्याचे आढळले.

छाप्यामध्ये पोलिसांनी आरोपीच्या घरातून एकूण ७ तलवारी (किंमत ९,५००)आणि ३ खंजर (किंमत २,०००) असा एकूण ११,५०० किमतीचा अवैध शस्त्रसाठा जप्त केला.

या प्रकरणी आरोपी आदित्य दुर्गासिंह ठाकुर (वय २० वर्षे) याच्याविरुद्ध कलम ४/२५, भारतीय हत्यार अधिनियम अंतर्गत पोलीस स्टेशन इतवारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्यांमध्ये एक प्रकारची भीतीची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *