क्राईम

गोदावरी नदी पात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई १७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड (प्रतिनिधी) नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदी पात्रात अवैध पद्धतीने रेती उपसा करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत एकूण १७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पिंपळगाव निमजी, वाहेगाव आणि गंगाबेट शिवारातील नदी पात्रात करण्यात आली.

आरोपी: अज्ञात इसम (पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पोहून पसार)

जप्त मुद्देमाल: अंदाजे ३० ब्रास रेती (किंमत १,५०,०००), रेती उपसण्यासाठी वापरलेली २ इलेक्ट्रीक इंजिन (किंमत ६,००,०००), २० तराफे (किंमत १०,००,०००)
असा एकूण १७,५०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत अवैधरित्या गौण खनिज (रेती) उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलिसांचे पथक पेट्रोलिंगदरम्यान कार्यरत असताना गुप्त माहिती मिळाली की, गोदावरी नदी पात्रात काही रेती माफिया तराफे आणि इलेक्ट्रीक इंजिनच्या सहाय्याने अवैधरित्या रेती उपसा करीत आहेत.

त्यावरून २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिसांनी नमूद तिन्ही ठिकाणी छापे टाकले. पोलिसांना पाहताच आरोपींनी नदीत उडी मारून पोहून पळ काढला. मात्र, घटनास्थळी रेती, इंजिन व तराफे आढळून आले.

जागेवरच पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करण्यात आला आणि काही अवैध उपकरणे कट्टरने कापून नष्ट करण्यात आली. जप्त केलेली रेती नंतर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.

सदर कारवाईनंतर महाराष्ट्र शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार **वेगवेगळ्या चार कायद्यांअंतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नांदेड ग्रामीण पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे रेती माफियांमध्ये एक प्रकारची भीतीची लाट निर्माण झाली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *