जिला

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला मोठा धक्का बसला आहे. या गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश

नांदेड :  नांदेडमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ व नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रा. रविंद्र दादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास सुमठाणकर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात ४ माजी नगराध्यक्ष, २३ माजी नगरसेवक, ८ विद्यमान नगरसेवक, २ माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती व सदस्य यांचा समावेश आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व नवागतांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हेमंत बेटमोगरेकर, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश काका पावडे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा प्रवेश सोहळा आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी मोठी ताकद ठरणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *