मराठवाडा

वंचित बहुजन आघाडीच्या भव्य जाहीर सभेला आणि पक्षप्रवेश सोहळा

हिंगोली : वंचित बहुजन आघाडीच्या भव्य जाहीर सभेला आणि पक्षप्रवेश सोहळ्याला आज प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली येथे हा कार्यक्रम पार पडत असून, हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी उसळली आहे.
सुजात आंबेडकर यांच्या सभेला सुरुवात होताच उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून पक्षाचा झेंडा हाती घेतला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक तसेच जिल्हास्तरीय नेते, कार्यकर्ते, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुजात आंबेडकर यांच्या भाषणाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, संपूर्ण परिसरात ‘जय भीम’च्या घोषणांनी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *