जिला

युवक काँग्रेस पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार – युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पठाण

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / आगामी काळातील हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नुकतीच मुदखेड येथील विश्राम गृहात तालुका व शहर युवक काँग्रेसचे बैठक आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी नांदेड जिल्हा युवक अध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांनी या बैठकीला मार्गदर्शन करत निवडणुकीसाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून 50 टक्के जागांवर युवक

काँग्रेसचे मागणी असणार असल्याचे सांगितले नगर परिषदेत एकूण 20 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडून आणणार असल्याचे निर्धार करण्यात आले, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुजीब पठाण यांनी आपल्या भाषणातून मागील काही काळापासून सक्रियपणे काम करत असलेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य निवडणुकीत तयार राहण्याचे आवाहन करत केल स्थानिक पातळीवरील संस्थेत काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविला जाईल अशी ग्वाही दिली.

या बैठकीस मुदखेड व ग्रामीण भागातून शेकडो युवक उपस्थित होते. अलीकडच्या काळात मागासवर्गीय सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी प्राध्यापक यशपाल भिंगे यांचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला

या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव गिरीश कोत्तावार ,जिल्हा उपाध्यक्ष राजू, चौदंते, तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील मुंगल प्रशांत पाटील मुंगल, श्याम पाटील शिंदे, माणिक पाटील मंगल, ज्ञानेश्वर पाटील मगरे ,संग्राम देशमुख शिवाजी वडजे, हनुमान लखे, बालाजी पवार, नितीन पवार, बालाजी पाटील शिंदे, शंभू पवार, सटवाजी पांडागळे वैभव कवळे तेजस जाधव महेश पवार शरद पवार संदीप गुडमलवार सुरेंद्र आठवले आदींची उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *