मजलिसच्या राजकीय चळवळीने अल्पसंख्याक समाजाला राजकीय न्याय मिळेल – माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांचे प्रतिपादन

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / मुदखेड शहरात दिनांक 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 07.00 वाजता शहरातील न्याहळी रोड मदिना नगर या ठिकाणी ऑल इंडिया मजलिस ए इतेहादूल मुस्लीमीन अर्थोत ( ए आय एम आय एम ) पक्षाकडून पक्ष आढावा म्हणजेच “हालात ए हाजरा” सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी उपस्थितांना आपल्या अध्यक्षीय भाषणातून असे सांगितले की देशात प्रत्येक राजकीय पक्ष अल्पसंख्याकांना भूलथापा देऊन समाजाचे मतदान
घेऊन समाजाच्या विकासाबद्दल कोणताही आराखडा तयार न करता समाजाला दुर्लक्षित करत त्यात शैक्षणिक ,सामाजिक, आर्थिक, भौगोलिक ,राजकीय ह्या मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्याचा काम करत असून त्या सर्व राजकीय पक्षांच्या सगळ्या भूलथापांना बळी न पडता अल्पसंख्याक समाजाने ऑल इंडिया मजलिस ए इतेहादूल मुस्लीमीन या राजकीय पक्षाला मजबूत करत मोठ्या स्वरूपात मदत केली पाहिजे सत्तेत आल्यास मुस्लिम समाजाला राजकीय न्याय देण्याची जबाबदारी मजलिस ए इतेहादूल मुस्लीमीन घेईल असे प्रतिपादन यावेळी सय्यद मोईन यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी अवेस कुरेशी यांनी नाते सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्रास्ताविक भाषणात भोकर विधानसभा मतदारसंघातील प्रभारी काझी अब्दुल लतिफ कासमी यांनी प्रस्ताविक भाषण करत वास्तविक परिस्थितीवर प्रकाश टाकत मजलीस राजकीय पार्टी कशासाठी गरजेची आहे याचे स्पष्टीकरण केले, एम आय एम चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष फिरोज लाला यांनी देशात कशाप्रकारे जुलमी राजवट अल्पसंख्याक समाजावर अत्याचार करत असून काळाची गरज आहे मजलीसच्या बॅनरखाली एकसंध होत
मजलीस चे हात बळकट करत सत्ता द्यावी नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष सोबत एकूण दहा प्रभागातून निवडक ठिकाणी एमआयएम उमेदवार देतील अशी घोषणा करत मजलिसवर विश्वास करत हात बळकत करण्याचे हात बळकट करण्याचेआव्हान यावेळी करण्यात आले, जिल्हाध्यक्ष मिर्जा अमजद बेग आपल्या भाषणातून युनायटेड होण्यासाठी आव्हान केले, मुदखेड एम आय एम च शहराध्यक्ष महंमद हुसेन यांनी भाजपा आणि काँग्रेसवर कडाडून टीका करत स्थानिकांना एमआयएम मध्ये प्रवेश करण्यासाठी आहावन केले, प्रभाग क्रमांक 10 मधून एम आय एम कडून इच्छुक असलेले मोहम्मद अफरोज बागवान यांनी एमआयएमच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आव्हान करण्यात आले
याप्रसंगी एमआयएमचे मोहम्मद मजीद , मोहसिन टेलर ,वाजिद भाई फुलारी, अफरोज बागवान, आवेश कुरैशी , सय्यद मुजीब अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद अल्ताफ यांनी केले यावेळी शहरातून मोठ्या संख्येने युवक ,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते



